पाली आणि मराठी ब्लॉग मागील हेतू : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यातील सोबतचा जवळचा मित्र म्हणजे android स्मार्ट फोन.आज काल प्रवासाल निघताना ही प्रवासी मोबाईल पॉवर बँक घेऊन फिरताना दिसतात. मनोरंजनासाठी वापर करताना ही दिसतात मात्र काही अभ्यासाच्या हेतूने ही android चा वापर करताना दिसतात. तेंव्हा ज्यांना पाली भाषेचं आकर्षण आहे आणि पाली भाषा शिकायची आहे मात्र कामाच्या या धगधगीच्या आयुष्यात पाली भाषेचे क्लासला जाणे शक्य नाही त्या त्या व्यक्तींसाठी हा ब्लॉग आहे . या ब्लॉग मार्फत एक प्रयत्न सुरू आहे की पाळी भाषेची गोडी ही निर्माण व्हावी कारण बरचस बौद्ध वाड्मय साहित्य हे पाली भाषेत मिळते तसेच पाली भाषेचा विचार केला असता .भारतीय साहित्यामध्ये पाली भाषेचे स्थान अतिशय महत्वाचे आहे असे दिसते . पाली भाषेला विश्वभाषा म्हणून मान्यता प्राप्त आहे. या ब्लॉग द्वारे मराठीभाषिकांना पाली शिकणे सहज सोपे होईल. या ब्लॉग ची लिंक share करा आणि अपडेट्स मिळविण्याकरिता subcribe करा.👍 नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय अत दीप भव
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा